आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:सौर पथदिव्यांचे बॅटरीचोर 6 तासांत जेरबंद ; ढोकी पोलिसांची तत्पर कारवाई

ढोकी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील दत्त मंदिरातील पथदिव्यांच्या बॅटरी चोरीचा तपास ढोकी पोलिसांनी सहा तासात करून दोन बॅटरी चोर जेरबंद केले आहेत.दत्त मंदिर परिसरात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने स्व. उत्तमराव पाटील जैव वने व उद्यान निर्मिती प्रकल्पांतर्गत दत्त टेकडीवर वृक्षलागवडीसह अंतर्गत रस्ते, बगीचा व खेळाचे साहित्य, शौचालय, वॉकिंग ट्रॅक उभारला. तसेच सौर उर्जेवर चालणारे १० दिवे बसवले. काही दिवसांपासून सौर उर्जेवरील लाइटच्या बॅटरी चोरीचे प्रकार वाढले. गुरुवारी (दि.३) राजपाल गुणवंतराव देशमुख वॉकिंग ट्रॅकवर फिरायला आले असता त्यांना सौर ऊर्जेच्या खांबाखाली बॅटरीसाठी असलेले कव्हर पडलेले दिसले.

त्यांनी बॅटरी पाहिली असत दिसली नसल्याने ढोकी पोलिस ठाण्यात ९५०० रुपयांच्या बॅटरी चोरीची फिर्याद दिली. तपास श्रीमंत क्षीरसागर हे करत होते. सहायक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सहायक फौजदार सातपुते, श्रीमंत क्षीरसागर, पोलिस कॉन्स्टेबल पांडे, थापकर यांच्या पथकाने सहा तासाच्या आत राजेश नगर ढोकी येथे राहणाऱ्या शौकत युनूस सय्यद (२९) व दस्तगीर इनायत पठाण (२८) या संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर या दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. ढोकी पोलिसांनी बॅटरी जप्त केली असून सहा तासात ढोकी पोलिसांनी घटनेचा छडा लावल्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...