आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानउघाडणी:प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा जिल्ह्यात बट्ट्याबोळ; मातोश्री पाणंद योजनेत मंजूर ४३९ पैकी ९८ रस्त्यांची कामे

उस्मानाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेस्थानकातील असुविधेवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील चांगलेच संतापले. दिशा समिती सभेत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत उस्मानाबादचे रेल्वेस्थानक भारत देशात नाही का, सातत्याने मागणी करूनही सुविधा का दिल्या जात नाहीत, प्रवाशांच्या होणारे हाल कसे थांबणार, अशी प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली. यावेळी त्यांनी “दिव्य मराठी’ने रविवारी रेल्वेस्थानकातील असुविधेबाबत प्रकाशित केलेली बातमीच वाचून दाखवली.

झेडपीच्या सभागृहात दिशा समितीची सभा सोमवारी पार पडली. यावेळी खासदार राजेनिंबाळकर, आमदार पाटील यांनी विविध विभागाचा आढावा घेतला. व्यासपिठावर अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रांजल शिंदे उपस्थित होते.

“दिव्य मराठी’ने रविवारी “उस्मानाबादच्या रेल्वेस्थानकाला अवकळा, टायलेट तुंबले, परिसरात दुर्गंधीचा दर्प’या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून स्थानकावरील असुविधेवर लक्ष केंद्रीत केले होते. यावर दिशा सभेत मोठी चर्चा झाली. वृत्ताचा हवाला देऊन खासदार राजेनिंबाळकर, आमदार पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नाच्या फैरी झाडल्या. आम्हीही सातत्याने रेल्वेने प्रवास करताेत, तेव्हा प्रवाशांचे हाल न पाहवणारे असतात, साधे कोच इंडीकेटरही आपल्याला बसवता आले नाही,

बहुतांश अधिकारी मोबाइलमध्ये गर्क, गांभीर्याचा अभाव
दिशा समितीची सभा प्रशासनाच्या कामाच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जाते. परंतु, उपस्थितांपैकी अनेक अधिकारी व कर्मचारी सभा सुरू असताना मोबाइलमध्ये गर्क होते. काही जण गेम खेळण्यात तर काही सोशल मीडियावरील पोस्ट पाहण्यात गर्क होते. महत्त्वाच्या बैठकांमध्ये अशी घातक मानसिकता जपणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होते आहे.

केवळ ९८ कामे सुरू ‘सही करताना पेन का कापतो’
मातोश्री पाणंद रस्ता योजनेतून ४३९ कामांना दोन्ही नेत्यांनी प्रचंड पाठपुरावा करून राज्य सरकारकडून मंजूरी आणली. मात्र प्रशासनाने केवळ आतापर्यंत १७२ कामांना कार्यारंभ आदेश दिला आहे. केवळ ९८ कामेच सुरू आहेत. यावर खासदार, आमदार चांगलेच संतापले. “आदेशावर सही करताना पेन का कापतो’, जिल्ह्यातील प्रशासन सरकारविरोधात काम का करत आहे, असे विचारत गती वाढवून दर आठवड्याला अहवाल देण्याचे दोघांनी सांगितले.

या संदर्भातही दिल्या सभेत सूचना....
खरिप पेरणी तोंडावर आल्यामुळे तातडीने डीएपी खताचा पुरवठा जिल्ह्यात वाढवण्यात याव्या. ६८ ते ८६ टक्के नुकसानाच्या प्रमाणानुसार विमा देण्याच्या प्रक्रियेसाठी प्रयत्न करा. राष्ट्रीय पेयजल योजनेतून कोट्यवधी खर्चूनही पाणी आले नाही,अशा गावांची यादी करा. पेयजल योजनेसाठी दर्जाहिन पाइप वापरल्याचे समोर आले. चांगले पाइप वापरा. २६१ नवीन वर्ग खोल्या बांधण्याची गरज असल्याने ५३.९६ कोटींची गरज आहे. उर्वरित निधीचे नियोजन करा.

शहरात स्वच्छ अभियानातून जागोजागी महिलांसाठी स्चच्छतागृहांची निर्मिती करा, सध्या त्यांची कुचंबना. बिंदूनामावलीचा घोळ लवकर संपवून तातडीने जिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांसाठी सोय करावी.बेंबळीतील ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी सीएसनी तातडीने प्रक्रीया करा.

बातम्या आणखी आहेत...