आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:बावची विद्यालय, राजे शिवाजी स्कूलचा पालक मेळावा उत्साहात

परंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बावची विद्यालय व राजे शिवाजी पब्लिक स्कूलचा पालक मेळावा उत्साहात पार पडला. दरम्यान पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी विविध विषयांवर चर्चा केली. शिक्षकांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षकांसह पालकांचे असून त्यांनीही विद्यार्थ्यांकडे घरी लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले.

बावची विद्यालयात पालक मेळाव्यास पालक रामराजे शिंदे, अशोक गरड, सूर्यवंशी, डॉ. अजित पवार, स्वाती पौळ मुख्याध्यापिका अनिता रोडगे नारायण खैरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. याप्रसंगी अनेक पालकांनी विविध विषयांवर विचार व्यक्त केले. विद्यालयाच्या वतीने नारायण खैरे यांनी पालकांना सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. विद्यालय करत असलेल्या विविध उपाययोजना व गुणवत्तेवर आधारित अध्यापन, स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे सांगितले.

भविष्यात हे विद्यालय शिक्षण क्षेत्रात मोठे काम करणार असून त्यात विद्यार्थ्यांचे हित जोपासले जाईल. पालकांनी विद्यालयाला सहकार्य करावे. तसेच पालकांच्या सूचनांवर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.

रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासंदर्भात वेळप्रसंगी रस्त्यावर व कायदेशीर कारवाईच्या वेळी सर्व पालक एकजुटीने विद्यालयाच्या मागे उभे राहतील, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमासाठी दोन्ही विद्यालयातील अनेक पालक उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी राजे शिवाजी पब्लिक स्कूल परंडा व बावची विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

बातम्या आणखी आहेत...