आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हावृत्त:पैशाच्या कारणावरून 2 भावंडांना मारहाण; ऑनलाइन  पैशांच्या व्यवहारावरून वाद

भूम19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात ऑनलाइन पैशाच्या व्यवहारावरून दोघा भावडांना जबर मारहाण केल्यामुळे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार आरोपी कदीर सौदागर, हनुमंत लष्कर, मोहसीन, शाबीर सौदागर यांना अटक करण्यात आली आहे.

सैफ बागवान व जुनेद बागवान यांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. जुनेद त्याचवेळी कदीर सौदागर व उत्तर प्रदेश येथील रहिवासी मोहसीन ( हल्ली मुक्काम भूम ) हे जुनेद यांच्या घरासमोर आले. त्यांनी त्यास हाक मारून बोलावुन घेतले. जुनेद हा घराच्या बाहेर येताच कदीर सौदागर याने तू आताच आमच्या सोबत चल असा आग्रह धरला. याचवेळी मोहसीन याने त्याच्याकडील पिस्तूल जुनेद याच्या कमरेला लावून तू स्कुटीवर बस असे म्हणत धमकावले. भीतीपोटी जुनेद हा गाडीवर बसला. त्यांनी त्यास परंडा रोडवरील धारीवाल टाऊनशिप येथे नेले. यावेळी जुनेदला लोखंडी टॉमीसह अन्य हत्याराने मारहाण करून जखमी केले. त्याचा भाऊ खालेद बागवानलाही मारहाण झाली. भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

बातम्या आणखी आहेत...