आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:दूध वाटपासह खटला माघारी घेण्यावरून मारहाण; परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भूम तालुक्यातील सांगवी (साडे) येथील बालाजी भास्कर देवकते (३५) हे शुक्रवारी (दि.१६) नऊ वाजेच्या सुमारास गावातील त्यांच्या किराणा दुकानात होते. यावेळी गावकरी सुभाष रामचंद्र देवकते यांनी तेथे जाऊन ‘तु व तुझा भाऊ माझ्या दुधवाल्यांना फोडतात काय’, असे बालाजी यांना म्हणून सुभाष यांच्यासह देवकते कुटुंबातील सुहास, आबासाहेब, राहुल, सुयोग, अजित, रामचंद्र तसेच गावकरी तुकाराम डोंबाळे, मोहन डोंबाळे, रेवण डोंबाळे यांनी बालाजी यांना शिवीगाळ करुन लोखंडी गज, काठीने मारहाण केली. यावेळी बालाजी यांच्या बचावास त्यांची आई मंगल व नातेवाईक पुढे सरसावले असता नमूद लोकांनी त्यांनाही मारहाण केली. यात मंगल यांचे दोन दात पडून त्या जखमी झाल्या.

तर दुसऱ्या घटनेत सांगवी (सांडे) येथील देवकते कुटुंबातील राहुल, बालाजी, सुनिल यासह शेंबडे कुटुंबातील धुळदेव, नवलाप्पा, योगेश, कैलास, संतोष तसेच लहु माने, लहु डोंबाळे, अंकुश डोंबाळे यांनी न्यायालयातील खटला माघारी घेण्याच्या कारणावरुन शुक्रवारी (दि.१६) ९ वाजेच्या सुमारास गावातील खेलदेव देवकते यांच्या घरासमोर ग्रामस्थ रामचंद्र खंडू देवकते यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सुभाष, आबासाहेब, सुयोग व राहुल यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहाण करत जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. बालाजी देवकते व सुभाष देवकते यांनी शुक्रवारी (दि.१६) परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरुन भूम पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...