आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:सुरक्षा रक्षकाला मारहाण, पुजाऱ्यांमध्ये फिल्मी स्टाइल हाणामारी, यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह

तुळजापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षा रक्षकाला दोघांनी बेदम मारहाण केली. त्याला सोलापूरला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या घटनेत दोन पुजाऱ्यांची फिल्मि स्टाइल हाणामारी झाली. तर तिसऱ्या घटनेत महिला सुरक्षा रक्षकाने भाविकांना असभ्य भाषा वापरल्याने गोंधळ उडाला. या तीन घटनांमुळे मंदिरातील सुरक्षा यंत्रणेचेच वाभाडे निघाले असून यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात खासगी सुरक्षा रक्षकाला लाथा बुक्क्यांसह तीक्ष्ण हत्याराने व दगड, नारळ, विटांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. ५) घडली. दिपक ज्ञानोबा चौगुले असे गंभीर जखमी सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्याला उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाविकांची दर्शन मंडपात घुसखोरी करण्यापासून रोखल्याचा राग मनात धरून सुरक्षा रक्षक दिपक चौगुले यांना दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षा रक्षक चौगुले ला पुढिल उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले.

सुरक्षा रक्षक चौगुले याला दोघांनी दर्शन मंडपाच्या दुसऱ्या मजल्यासमोरून ताब्यात घेत मारहाण करत टोलेच्या पायऱ्यावरून टोळ भैरव दरवाजा ते पाटील वाड्याचा कोपऱ्यापर्यंत मारहाण करत आणले. मंदिरात शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे असताना सुद्धा एवढ्या प्रदीर्घ काळ मारहाण होत असताना मंदिर संस्थानला याचा सुगावा लागू नये याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महिला सुरक्षा रक्षकाने भाविकांशी असभ्य भाषा वापरत उध्दट वर्तन केल्याचा प्रकार घडला. शेवटी महिला सुरक्षा रक्षकाच्या माफीनाम्या नंतर प्रकरण मिटले. अन्य एका घटनेत दुपारी २ च्या सुमारास होम कुंडा समोर दोन पुजाऱ्यांमध्ये फिल्मी स्टाईल मध्ये हाणामारीची घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एकूणच या प्रकारामुळे मंदिर संस्थान ची सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...