आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण:विद्यापीठाच्या ऑफलाइन परीक्षांना सुरूवात; परीक्षा केंद्रावर अनेक विद्यार्थींची परीक्षा

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या प्रादुर्भावाने गेल्या दोन वर्षा पासून रद्द करण्यात आलेल्या विद्यापीठाच्या ऑफलाईन विद्यापीठीय परीक्षांना एक जूनपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. दोन वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर विद्यापीठीय परिक्षांना विद्यार्थी सामोरे जात आहेत. परीक्षार्थीत आनंदाचे वातावरण असून शहरात आदर्श महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अनेक विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने एक जून पासून कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्गाच्या विद्यापीठीय परीक्षेला सुरु झाल्या आहेत. कोरोना प्रादुर्भावात रद्द करण्यात आलेल्या परीक्षा पुन्हा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय उच्चशिक्षण विभागाने घेतल्याने विद्यार्थ्यांचा परीक्षांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. प्राचार्य डॉ दिलीप गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा डॉ राम सोलंकर परीक्षा प्रमुख म्हणून काम पहात आहेत. या विद्यापीठीय परीक्षा केंद्रावर श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा, श्री शरदचंद्र पवार महाविद्यालय नारंगवाडी,आदर्श महाविद्यालय उमरगा या तीन महाविद्यालयातील परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. या परिक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा समन्वय समिती स्थापना करण्यात आली आहे . प्राचार्य डॉ. दिलीप गरूड, उपप्राचार्य डॉ सुरेश कुलकर्णी, प्रा डॉ सर्जेराव माळी यांचा समितीत सहभाग आहे.

बातम्या आणखी आहेत...