आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राजकीय अस्थिरतेमुळे आमरण उपोषण मागे; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केले होते आंदोलन

उमरगा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात १५ जून पासून कवठा येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी अन्न, पाणी त्याग करून आमरण उपोषण करीत यात्रा सुरू केली होती. या यात्रेचा आळंदी येथे २५ जून रोजी सांगता होणार होती.

दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्याने बुधवारी (२२) अखेर कवठा ग्रामस्थांच्या विनंतीनंतर विनायकराव पाटील यांनी अन्न-पाणी व देहत्याग उपोषण मागे घेतले. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या थांबवाव्यात, शेती मालाला हमीभाव मिळावेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे पैसे मिळावेत. शेतीसाठी दिवसा बारा तास वीज मिळावी. आदीसह शेतकऱ्यांच्या प्रश्ना बाबत गेल्या दोन वर्षा पासून विविध आंदोलने करून शासना कडे पाठपुरावा करीत आहेत.

शासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पुर्तता केली जात नसल्यामुळे १५ जून पासून अन्न-पाणी वर्ज करत उपोषणाची यात्रा सुरू केली होती. उपोषण कालावधि दरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. यावेळी बोलताना तहसीलदार राहुल पाटील म्हणाले कि श्री पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी कृषि व पशु प्रदर्शने भरवून शेतकऱ्यांना आधुनिक शेती व्यवसायाचा मंत्र दिला आहे. प्राचार्य डॉ. दिलीप गरूड यांचे भाषण झाले. स्वतः उपाशी राहून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाला न्याय मिळवून देण्याच कार्य विनायकराव पाटील करीत आहेत.

दीड हजार किमीचा प्रवास
शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडून उदासीनता दाखविली जात आहे. शासनाच्या विरोधात अनेक आंदोलने, उपोषणे केली आहेत. सध्या सरकार अस्थिर असल्यामुळे माझे अन्न त्याग व देह त्याग आंदोलन ग्रामस्थांच्या विनंती वरून मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपोषण कालावधी दरम्यान त्यांनी तुळजापूर , पंढरपूर, कोल्हापूर ते आळंदी असा दीड हजार किमीचा प्रवास पूर्ण केला. मंगळवारी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाल्याने त्यांना कवठा ग्रामस्थांच्यावतीने तूर्त उपोषण व देहत्याग अंदोलन मागे घेण्याची विनंती केल्याने त्यांनी आमरण उपोषण मागे घेतले.

बातम्या आणखी आहेत...