आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:भूकंपप्रवण भाग असल्याने तज्ञांंनी केले सविस्तर मार्गदर्शन

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री.महात्मा बसवेश्वर विद्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या वतीने गुरुवारी दि.१ रोजी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी वृषाली तेलोरे व एनडीआरएफ चे टीम कमांडर सुशांत शेट्टीयांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा व्यवस्थापन अधिकारी तेलोरे यांनी आपत्ती संदर्भामध्ये माहिती दिली.

यावेळी बोलताना म्हणाल्या की, आपला परिसर हा भुकंप बाधित असल्याने भूकंपामुळे होणारी हानी माहित आहे ,मात्र यापासून दक्षता घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना विद्यार्थ्यांनी आपले घर, नातेवाईक व शेजारी यांना योग्य पध्दतीने करून दिल्यास जीवितहानी टाळता येवु शकते. भूकंपाचे धक्के जाणवाया लागल्यास शक्यतो मोकळ्या मैदानात जावे ते शक्य नसल्यास घरातील सुरक्षित जागा चौकटीचा खालचा भाग टेबल, पलंग आदीचा बचावासाठी आश्रय घेवू शकतो.

आपल्याकडे अनेक प्रकारच्या नैसर्गीक आपत्ती येत असून शांत संयमी राहून योग्य प्रकारे काळजी घेतल्यास त्यावर सहज मात करू शकतो. असे तेलारे म्हणाल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याची माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. शिवाजीराव वडणे, मुख्याध्यापक नेताजी गायकवाड , प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सविता लोहार दोन्ही शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कोथळीकर यांनी तर आभार प्रदर्शन माधव माने यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...