आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लाभार्थी योजनांचा भार ‘योजना’ शिक्षणाधिकाऱ्यांवर ; सुधा साळुंके यांच्या रूपाने पहिल्या योजना शिक्षणाधिकारी

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागातील विद्यार्थी लाभार्थी असलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी योजना विभाग शिक्षणाधिकाऱ्यांवर असणार आहे. जिल्ह्यासाठी पहिले योजना शिक्षणाधिकारी म्हणून सुधा साळुंके यांची नियुक्ती झाली असून यामुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आता केवळ शैक्षणिक कामे करण्यासाठी वेळ उपलब्ध होणार आहे.

काही वर्षांपासून जिल्हा परिषद व अन्य मराठी शाळांमधील गळतीचे प्रमाण अधिक होते. यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती स्थिर राहावी यासाठी विविध योजना शाळांमध्ये सुरू करण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या संरक्षण, आरोग्य, सामाजिक स्तर उंचावण्यासाठी योजना सुरू करण्यात आल्या. मात्र, कामाच्या प्रचंड व्यापामुळे काही योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात नव्हती. तसेच झालेल्या अंमलबजावणी झालेल्या योजनांचा दर्जा व्यवस्थित राहत नव्हता. यामुळे आता शासनाने शिक्षण विभागासाठी खास योजना विभाग तयार केला आहे. यासाठी पूर्वीच्या निरंतर शिक्षण विभागाची रचना वापरण्यात येऊन यालाच योजना विभाग असे नाव देण्यात आले आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यासाठी पहिल्या योजना शिक्षणाधिकारी म्हणून सोलापूरच्या उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसे परिपत्रकही निर्गमित करण्यात आले आहे. साळुंके या एका आठवड्यात येथे रुजू होणार आहेत. येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील पूर्वीच्या निरंतर शिक्षण विभागातच त्यांचे कार्यालय असणार आहे. त्यांच्या दिमतीला अन्य दोन लिपिक वर्गिय कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली असून आणखी काही कर्मचारी नियुक्त होण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे सोपे विविध योजनांचा हिशोब, निधीचे वितरण आदीसाठी मा. व प्रा. शिक्षण विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांचा वेळ जात होता. यामळे शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावत होता. विशेष म्हणजे सध्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना शाळांमध्ये भेटी देण्यासाठी वेळच मिळत नव्हता. आता योजनांचा भार हलका झाल्यामुळे शाळांची शैक्षणिक गुणवत्ता दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सोपे होणार आहे.

या योजना वळवल्या जाणार नवीन योजना विभागाकडे विद्यार्थ्यांच्या लाभांच्या सर्व योजना वळवल्या जातील. शालेय पोषण आहार, सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना, राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना, गणवेश वाटप योजना, आरोग्य विषयक लसीकरण, आरोग्य तपासणी संदर्भातील योजनांचे नियोजन, अशा सर्व केवळ विद्यार्थी केंद्रीत योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम योजना विभागाकडे असणार आहे.

४ वर्षांत २४ वेळा बदलले प्राथमिक शिक्षणाधिकारी शासनाने साळुंके यांना उस्मानाबादला नियुक्त करताना ताण विरहितपणे नियुक्त केलेले नाही. त्यांच्यावर आता येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचाही भार टाकण्यात आला आहे. कदाचित यामुळे साळुंके यांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. उस्मानादला अजूनही दीर्घकालीन नियमित प्राथमिक शिक्षणाधिकारी मिळत नाहीत. मागील चार वर्षात २३ वेळा या पदाचा पदभार बदलल्यानंतर आता साळुंके २४ व्या वेळी पद घेणाऱ्या प्राथमिक शिक्षणाधिकारी ठरतील.

माझ्यावर विद्यार्थीकेंद्रीत सर्व योजना राबवण्याची जबाबदारी येत्या आठवडाभरात उस्मानाबादला योजना शिक्षणाधिकारी म्हणून रुजू होणार आहे. माध्यमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थी केंद्रीत सर्व योजना राबवण्याची जबाबदारी योजना विभागाकडे असणार आहे. सुधा साळुंके, शिक्षणाधिकारी (योजना.)

बातम्या आणखी आहेत...