आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुबलक पाणीसाठा:बेन्नीतुरा मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला

मुरुम14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिसरातील गावांची तहान भागवणारा बेन्नीतुरा मध्यम प्रकल्प ऑगस्ट महिन्यात शंभर टक्के भरला आहे.तालुक्यात तीन मध्यम प्रकल्प असून दोन दिवसांपूर्वी तुरोरी मध्यम प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. मुरूम येथील बेन्नीतुरा प्रकल्पात ९६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता तर जकापूर प्रकल्पात ६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेला होता. दोन दिवस झालेल्या पावसामुळे बेन्नीतुरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे वाहत आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा प्रकल्प भरण्याची ही दुसरी वेळ आहे. मध्यम प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने मुरूमसह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. जकापूर प्रकल्पातही पाणीसाठा वाढला असून दोन ते तीन दिवसात पाऊस झाल्यास तालुक्यातील तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...