आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभीष्टचिंतन:आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ; गोरोबाकाकाच्या समाधीचे घेतले दर्शन

तेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची जन्मभूमी असलेल्या तेर येथे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नवनाथ नाईकवाडी,व ग्रा.प.सदस्यांनी फेटा पुष्पहार शाल देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रारंभी आ.पाटील यांनी ग्रामदैवत संत श्रेष्ठ गोरोबाकाकाच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.आ.पाटील यांच्या तेर येथील निवासस्थानी रचना कन्स्ट्रक्शनच्या वतीने दत्तात्रय मुळे यांच्यासह,संजय धाकपाडे, बालाजी धाकपाडे भास्कर माळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नवनाथ इंगळे यांनी आ.पाटील यांचे अभीष्टचिंतन केले.

माजी उपसरपंच भारत नाईकवाडी,रविराज चौगुले जुनेद मोमीन, विठ्ठल लामतुरे ,पद्माकर फंड, बालाजी पांढरे, इर्शाद मुलानी,सुरेश माने पांडुरंग भक्ते प्रज्योत रसाळ,सचीन आबदरे नारायण साळुंके अर्शद मुलाणी, गणेश लोमटे अजीत कदम आदींनी अभीष्टचिंतन केले दरम्यान तेर येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये तेरणा सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान शिबिरात ३२५ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६३ दुर्धर रूग्णांना नेरुळ येथील हॉस्पिटल मध्ये उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात येणार आहे. आजवर तेरणा हाॅस्पिटलच्या वतीने २५८ शिबिरात १० लाखांच्या वर रूग्णाच्या मोफत तपासणी व औषधोपचार करण्यातआले असल्याची माहिती प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे यांनी यावेळी दिली.

बातम्या आणखी आहेत...