आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क राहावे; सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश यांचे तेर येथे मार्गदर्शन

तेर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांनी ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क राहून पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कळंब येथील सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी केले आहे.

शनिवारी (दि. ११) तेर व परिसरातील पोलिस पाटील, ग्रामसुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एम. रमेश बोलत होते. यावेळी तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, ढोकीचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत, उपनिरीक्षक भागवत गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. काही फायनान्स कंपन्या लॉटरी लागली आहे, पॉलिसी बंद पडली आहे, असे बहाणे करुन खाते नंबर, आधार कार्ड क्रमांकाची मागणी करतात. त्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते.

यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. ते म्हणाले की, रस्त्यावर, कॉलनीत कोणीही संशयित व्यक्ती दिसल्यास पोलिसांनी माहिती देऊन घरफोडी, दरोडे टाळण्यासाठी ग्रामसुरक्षा दलातील युवकांनी सतर्कता बाळगावी. या वेळी ग्रामसुरक्षा दलातील युवकांना संरक्षक साहित्याचे कीटचे देण्यात आले. यावेळी उपसरपंच रविराज चौगुले, तेरच्या पोलिस पाटील फातेमा मनियार, वाणेवाडीचे पोलिसपाटील प्रदीप घेवारे, बीट अंमलदार प्रकाश तरटे, पोलिस निरीक्षक गोविंद खोकले, पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...