आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत श्रेष्ठ गोरोबाकाकाच्या पावन नगरीत रविवार दि.२५ डिसेंबर पासून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व भव्य किर्तन महोत्सवास वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रागंणात होणार असून याकाळात नामवंत किर्तनकारांचे किर्तन होणार असल्याची माहिती हभप रघुनंदन महाराज पुजारी यांनी दिली. २५ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ पर्यंत हा महोत्सव होणार आहे.
भागवताचार्य शिवानंद महाराज शास्त्री पैठण यांची भागवत कथा होणार आहे.रविवार दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी प्रफूल महाराज मोरे यांचे व सायंकाळी विनोदाचार्य बाळू महाराज गिरगावकर यांचे किर्तन २६ डिसेंबर रोजी सकाळी हभप.विजय महाराज बालगीर हभपश्रीकांत महाराज कदम व सांयकाळी हभप अक्रूर महाराज साखरे यांचे किर्तन २७ डिसेंबर मंगळवार रोजी ज्ञानेश्वर महाराज सोनवणे व पार्थ महाराज फावसे व सांयकाळी संजय महाराज धोंडगे यांचे किर्तन होणार आहे. बुधवार दि.२८ रोजी विजय महाराज डक व सांयकाळी समाज प्रबोधनकार हभप निवृती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन होणार आहे.
२९ डिसेंबर रोजी सकाळी विनोदाचार्य कालीदास नाईकनवरे व सांयकाळी हभपजयवंत महाराज बोधले ३० डिसेंबर रोजी सकाळी हरी महाराज चाकूरकर व हभप विनोदाचार्य शिवा महाराज बावस्कर यांचे तर ३१ डिसेंबर रोजी सकाळी भागवताचार्य महारूद्र महाराज पवार यांचे तर सांयकाळी भागवताचार्य विनोदवीर विशाल महाराज खोले यांची किर्तनसेवा होणार आहे.
३० डिसेंबर रोजी कृष्णा महाराज जोगदंड यांचा भारूडाचा कार्यक्रम होणार असून ३१ डिसेंबर रोजी सांयकाळी नववर्षाच्या पूर्वसंध्येला वैराग्य महामेरू शिक्षण संंस्थेच्या विद्यार्थ्यांचा सोलो वादनचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.१ जानेवारी २०२३ रोजी हभ .गोविंद महाराज पांगारकर यांचे काल्याचे किर्तनानंतर महाप्रसाद होऊन या महोत्सवाची सांगता होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.