आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन:यशराज पब्लिक स्कूलमध्ये  भारत माता अन् आईची पूजा

उस्मानाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील यशराज पब्लिक स्कूलमध्ये साेमवारी (दि.१) लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच विद्यार्थ्यांनी आईचे चरण धुवून हळदी-कुंकू लावून पूजन करत आशीर्वाद घेतले. दरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन केले.

उस्मानाबाद येथील यशराज पब्लिक स्कूलमध्ये १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा जवळीकर यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे चरण पाण्याने स्वच्छ धुवून हळदी कुंकू लावून पूजन करत दर्शन घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, पालक सहभागी झाले होते. तसेच स्कूलच्या शिक्षिका पल्लवी सूर्यवंशी, ज्योती जायभाय, रेखा भाकरे, सुभद्रा गायकवाड, प्रणिता गरड, जयवंत ओमणे, सीमा सांगवे, मेघा मिटकरी, अपर्णा झाडके, सुनंदा हाक्के, यांची उपस्थिती होती. दरम्यान शिक्षिका झाडके यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या कार्याची माहिती देत मुलांना आईचे महत्व पटवून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अपर्णा झाडके यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...