आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबाबदारी:भारत शिक्षण संस्थेने स्वीकारले 30‎ निराधार बालकांचे पालकत्व‎

उमरगा‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत शिक्षण संस्था उपाध्यक्ष तथा‎ विद्यापीठ अधिसभा सदस्य अश्लेष‎ शिवाजीराव मोरे यांनी शहरातील‎ जिल्हा परिषद प्रशालेतील अनाथ,‎ होतकरू ३० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक‎ पालकत्व स्वीकारले आहे.‎ शाळेत ३० विद्यार्थी निराधार असून‎ अश्लेष मोरे यांनी या ३० विद्यार्थ्यांचे‎ पालकत्व स्वीकारले असून शालेय‎ ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाची‎ जबाबदारी त्यांनी घेतली.

यावेळी‎ शाळेतील विद्यार्थ्यांना आमदार‎ ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व‎ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा‎‎‎‎‎‎‎‎‎ शकुंतला मोरे यांच्या उपस्थित‎ विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक‎ साहित्य वाटप करण्यात आले.‎ यावेळी कोथळीचे सरपंच‎ आप्पासाहेब पाटील, उपप्राचार्य प्रा.‎ डॉ. संजय अस्वले, डॉ. धनाजी‎ थोरे, प्रा. डॉ. विनोद देवरकर,‎ अश्लेष मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष‎‎‎‎‎‎‎‎‎ विशाल कानेकर, मुख्याध्यापक‎ पद्माकर मोरे बलभीम चव्हाण,‎ संजय रुपाजी, शिल्पा चंदनशिवे,‎ ममता गायकवाड, सोनाली मुसळे,‎ ‌बशिर शेख, विद्यानंद सुत्रावे व‎ विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षिका‎ सरिता उपासे यांनी सूत्रसंचालन‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...