आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:उमरग्यात भारत विद्यालयाची यशाची परंपरा कायम; विद्यार्थ्यांचा सत्कार

उमरगा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत शिक्षण संस्था संचलित शहरातील भारत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ मध्ये यश मिळवत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली असल्याने शनिवारी (१८) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक शाहूराज जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश पवार हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. पर्यवेक्षक विक्रांत मोरे, संजय देशमुख-ढोणे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर दासिमे आदी उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी तात्याराव मोरे यांचे पुतळ्याचे पूजन उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या हस्ते झाले. चैतन्य काळे व स्नेहा बिराजदार यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम आले. भाग्यश्री बिराजदार द्वितीय, सानिका शिंदे हिने तृतीय क्रमांक मिळवले असून यांच्यासह यश संपादन केले असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार व कौतुक करण्यात आला. विशेष प्राविण्यासह १६ तर प्रथम श्रेणीत ५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत चैतन्य काळे, स्नेहा बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक शाहूराज जाधव यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार पुढील शिक्षण घेऊन यशाचा आलेख उंचावत ठेवावा असे सांगून गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.पर्यवेक्षक संजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सहशिक्षक व्यंकट गुंजोटे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक दुधाराम क्षीरसागर यांनी आभार मानले.

तालुक्यातील तलमोड श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मार्च २०२२ मध्ये संपन्न झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयातील ७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी ७८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. सृष्टी राघवेंद्र पाटील हिने ९५.२० टक्के गुण मिळवून प्रथम आली. श्रुती व्यंकट मोरे ९५ टक्के, शकुंतला महेश जाधव ९४ टक्के गुण मिळविले.

विशेष प्राविण्यासह ६५ व प्रथम श्रेणीत १२, द्वितीय श्रेणीत एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैय्या मोरे, उपाध्यक्ष व शालेय समिती अध्यक्ष अश्लेष मोरे, संचालक मंडळ, मुख्याध्यापक विराज मोरे यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...