आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:बुरगुंडा होईल गं भारुडाने भाविक झाले मंत्रमुग्ध ; पाळखी सोहळ्याची सांगता

तेर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत शिरोमणी गोरोबाकाकांचा पायी पालखी सोहळा सोमवारी दाखल झाला. यावेळी कृष्णा महाराज जोगदंड यांनी ‘बये तुला बुरगुंडा होईल गं’ या भारुडाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. भारुडाच्या कार्यक्रमाने पालखी सोहळ्याची सांगता झाली.कार्तिक शुद्ध एकादशी सोहळ्यासाठी २६ ऑक्टोबरला पंढरपूर येथे गेलेली पालखी १८ नोव्हेंबर रोजी तेर येथे स्वगृही परतली. सायंकाळी ग्रामपंचायतीसमोर कृष्णा महाराज जोगदंड (लातूर) यांचा भारुडाचा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी सादर केलेला ‘बये तुला बुरगुंडा होईल गं’ या भारुडाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासोबतच ‘वेडी झाली ग, बाई वेडी झाली ग, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई’ या भारुडाचे सादरीकरण केले.

रात्री त्रिविक्रम मंदिरासमोर कीर्तन झाले. रविवारी (दि.२०) एकादशी असून गोरोबाकाकांची पालखी पंढरपूर येथून आल्यामुळे दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी होणार आहे. दरम्यान, शंभर वर्षानंतर प्रथमच गोरोबाकाकांच्या पादुका पांडुरंगाच्या भेटीसाठी मंदिरात नेल्या होत्या, अशी माहिती दीपक महाराज खरात यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...