आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय समिती:भाटशिरपुरा शालेय समिती अध्यक्षपदी गायकवाड, उपाध्यक्षपदी कीर्ती झोंबाडे

कळंब4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भाटशिरपुरा येथील जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रियंका गायकवाड तर उपाध्यक्षपदी कीर्ती झोंबाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या समितीमध्ये अध्यक्षपदी प्रियंका स्वप्निल गायकवाड तर उपाध्यक्षपदी कीर्ती उमेश झोंबाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य म्हणून अतुल विक्रम गायकवाड, सुशिल अच्युत गायकवाड, अशोक सुधाकर गायकवाड, अनंत प्रभू गायकवाड, शामल श्रीकांत खापे, मनिषा शंकर डीगे, रामहरी पांडुरंग उळगे, युन्नूस खाँजामिया शेख, नसरिन आरेफ यांची निवड करण्यात आली आहे.

शिक्षक प्रतिनिधी म्हणून सचिन शहाजी तामाने तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रगती दत्तात्रय गायकवाड, कुमार विजयराजे पांडुरंग वाघमारे, सचिव म्हणून मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे या सर्वांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे.

या प्रसंगी सरपंच सुनिता वाघमारे. उपसपंच सूर्यकांत खापे, ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड, दिलिप वाघमारे, मावळेते अध्यक्ष गोपाळ अभिमान रितपुरे, माजी अध्यक्ष रमेश रितपुरे यांच्यासह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक सभा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक प्रदीप रोटे, शहाजी बनसोडे, संजय झिरमिरे, सचिन तामाने, प्रमोदिनी होळे, रंजना थोरात, दिलीप पवार यांनी पुढाकार घेतला.स

बातम्या आणखी आहेत...