आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक अडचणीचा सामना:भाऊसाहेब बिराजदार को. ऑप. बँकेची प्रगती कौतुकास्पद ; अजित पवार यांचे प्रतिपादन

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिशय कठिण काळात आणि आर्थिक अडचणीचा सामना करत चांगल्या पद्धतीने पारदर्शक असा व्यवहार करुन भाऊसाहेब बिराजदार अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेने केलेली ही प्रगती कौतुकास्पद आहे असे मत महाराष्ट्र माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

भाऊसाहेब बिराजदार अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेच्या रौप्य महोत्सवी वर्षे आणि नुतन भव्य इमारतीचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार सतीश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्ष जीवनराव गोरे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना विरोधी पक्षनेते पवार म्हणाले की, मराठवाड्यासारख्या अवर्षणग्रस्त भाग अद्यापही विकासापासून खुप मागे आहे. जिल्ह्यात सर्वाधिक भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आला असून पुढील वर्षीत गाळपामध्ये कारखान्याची क्षमता सहा हजार मेट्रिक टन प्रतिदिन केली जाईल, चार लाख लिटर क्षमतेचा डिस्टलरी प्रकल्प व ३२ मेगावॅट वीजनिर्मिती उपकेंद्र उभा करण्यात येणार असल्याची माहीतीही दिली. भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना हा चांगल्या पद्धतीने चालवून शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हजार ३५० रुपये भाव दिलेला असून दिवाळीपुर्वी आणखीन १५०रुपये हप्ता शेतकऱ्यांचे खात्यात जमा करुन दोन हजार ५०० रुपये सर्वाधिक भाव दिला जाईल असे आश्वासन दिले.

बॅंकेचे चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, बॅंकेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त कर्जाचे व्याज दरात दोन टक्के कपात केली जाणार आहे. बॅंकेला सभासद व कर्जदारांनी उत्तम साथ दिली तर बॅंकेच्या सर्व शाखा स्वतःच्या मालकी जागेत सुंदर इमारती उभे करु असे श्री बिराजदार म्हणाले.

भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने सर्वाधिक भाव दिल्याने शेतकऱ्यांच्या वतीने अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेचे चेअरमन वसंतराव नागदे, विद्यापीठ परिषद सदस्य संजय निंबाळकर, शैलजाताई मगर, महेंद्र धुरगुडे, सक्षणा सलगर, सुनिल माने, गोकुळ कारखान्याचे चेअरमन व्ही पी पाटिल, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव युवा नेते दिग्विजय शिंदे आदी उपस्थित होते. संचालक सुनील माने यांनी आभार मानले ओके, खोके जनता खपवून घेणा नाही.

जनतेला ओके खोके असे काही चालत नाही. १९९२ साली सेनेत बंड झाले त्यावेळी १७-१८ आमदार पक्ष सोडून गेले त्यापैकी एकही निवडून आला नाही. दुसऱ्यांदा राणे साहेब यांनी सेना सोडली त्यांना व त्यांच्या मुलाना सुद्धा पराभव पहावा लागला. जनता गद्दाराना धडा शिकवते असा इशारा देवून राज्यातील जनता वाचाळवीरांना धडा शिकवील.

नागरिकांना गद्दारी आवडत नाही
राज्यातील सत्ता बदलाच्या घडामोडीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, सन १९८२ च्या काळातील शरद पवार साहेबांना सोडून ५५ आमदारापैकी ५०आमदार सोडून गेले होते. साहेब खचले नाहीत. पुढच्या निवडणुकी वेळी पवार साहेबांनी ५५पेक्षा जास्त आमदार निवडून आणले. त्यामुळे ठाकरे साहेब घाबरु नका, खचू नका पुन्हा तुमचेच आमदार यापेक्षा जास्त निवडून येतील. जनतेला ही गद्दारी आवडत नाही. गद्दारी करणाऱ्याना जनता धडा शिकवते अन पाडते असा धीरोदात्त सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला.

बातम्या आणखी आहेत...