आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:होर्टी येथे सभामंडप कामाचे भूमिपूजन; आमदार निधीतून शिवलिंगेश्वर मंदिराचे काम

नळदुर्ग20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आमदार निधीतून दहा लाख रुपये खर्च करून येथे बांधण्यात येणाऱ्या श्री शिवलिंगेश्वर मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन ११ सप्टेंबर २०२२ रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला.

यावेळी विक्रम देशमुख, अॅड. दीपक आलूरे, आनंद कंदले, भिवाजी इंगोले, राहुल साठे, अमित मोगरकर, प्रभाकर मुळे, सिद्रामप्पा खराडे, दता राजमाने, महादेव पाटील, विलास राठोड,होर्टी चे सरपंच सुवर्णा गुंजीटे, उपसरपंच अशोक राजमाने, विलास गायकवाड सुलक्षणा भोसले, बेबी नंदा कांबळे ,पद्मिन भोसले,कमल सराटे, विमल चव्हाण, सिनाप्पा गुंजोटे, लक्ष्मण कुंभार, हरिदास भोसले, चिकुंद्राचे सरपंच दादा जाधवर, उपसरपंच शंकर मोटे, यांच्यासह ग्रामस्थ व विविध गावातून आलेले राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. नंतर आभारप्रदर्शन झाले.

बातम्या आणखी आहेत...