आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील मळगीवाडी येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांचे प्रयत्नातून लोकप्रतिनिधी सुचवलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत मंजूर असलेल्या दहा लाख रुपये सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन रविवारी (५) माजी खासदार रविंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार ज्ञानराज चौगुले होते. यावेळी युवा नेते किरण गायकवाड उपस्थित होते. तसेच आमदार स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या सात लाख रुपये खर्चाच्या सार्वजनिक स्मशानभूमी याचाही लोकार्पण करून लोकांच्या सेवेत खुली करण्यात आली.
यावेळी शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख बलभीम येवते, युवा सेनेचे योगेश तपसाळे, सरपंच सतीश सोमवंशी, शिवसेना उपतालुकाप्रमुख व्यंकट पाटील, कसगीचे सरपंच हणमंत गुरव, मळगीच्या सरपंच योगिता बिराजदार, बाजार समिती संचालिका अनुराधा जाधव, कदेरचे सरपंच सतीश जाधव, बालाजी बनसोडे, विश्वनाथ शिंदे, सी बी बिराजदार, भरत कलबुर्गे, माजी उपसरपंच प्रेमनाथ येवते, बंजारा समाजाचे नेते बब्रुवान चव्हाण, सुधाकर पाटील, रामराव बिराजदार, नेताजी तलमोडे, विठ्ठल आडवे, उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.