आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभारंभ:विलासपुरात विकासकामांचे भूमिपूजन‎

लोहारा‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील विलासपूर पांढरी येथे‎ रविवारी (दि.५) आमदार ज्ञानराज‎ चौगुले यांच्या हस्ते विविध‎ विकासकामांचा शुभारंभ करण्यात‎ आला.‎ आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या‎ प्रयत्नांतून मंजूर असलेल्या जल‎ जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा‎ योजना राबवण्याच्या ५६ लाख‎ रुपयांचा कामाचा यात समावेश आहे.‎ तसेच आमदार स्थानिक विकास‎ निधीतून मागासवर्गीय वस्तीत रस्ता‎ करण्यासाठी सहा लाख रुपये,‎‎‎‎‎‎‎‎ गावांतर्गतच रस्ता करण्यासाठी दहा‎ लाख रुपये या कामांचाही शुभारंभ‎ करण्यात आला.

यावेळी शिवसेना‎ जिल्हाप्रमुख मोहन पनुरे,‎ तालुकाप्रमुख जगन पाटील, माजी‎ तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी,‎ सरपंच मारुती कार्ले, उपसरपंच‎ अशोक जांभळे, सदस्य बसवेश्वर‎‎‎‎‎‎‎‎ कार्ले, दगडू भिसे, सुभाष पाटील,‎ माजी उपसरपंच महादेव कार्ले,‎ बसवेश्वर स्वामी, तंटामुक्त समिती‎ अध्यक्ष पंडीत कार्ले, व्यंकट पाटील,‎ पोलीस पाटील सूर्यकांत पाटील,‎ अभिमान खराडे, नगरसेवक‎ अविनाश माळी, माजी पं.स. सदस्य‎ इंद्रजीत लोमटे आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...