आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेतेपद पटकावले:भोसले हायस्कूलचा संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने शहरातील गुरुवर्य स्व. के. टी. पाटील क्रीडा संकुलाच्या मैदानावर शुक्रवारी (दि.१६) घेण्यात आलेल्या १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे. या कामगिरीमुळे हा क्रिकेट संघ विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

विजयी संघाला जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, क्रीडा अधिकारी लटके, यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता सातवीचे पर्यवेक्षक आर. बी. जाधव, स्पर्धा प्रमुख विक्रम सांडसे, मार्गदर्शक इंद्रजीत वाले, शशांक जाधव उपस्थित होते. विजयी संघ व मार्गदर्शकांचे संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, संस्थेच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, प्राचार्य एस. एस. देशमुख यांनी अभिनंदन करुन विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...