आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भुसणी महालक्ष्मीची यात्रा भक्तिभावाने संपन्न ; आराधी मंडळांची जागर सेवा, भजनाचे कार्यक्रम

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भुसणी येथील महालक्ष्मी मंदिराच्या यात्रा महोत्सवाचे मंगळवारी (दि.१) उत्साहात संपन्न झाली. भूसणी, औराद व कदेर सिमेवरती असणाऱ्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या यात्रेचे सातवे वर्ष असून यासाठी तालुक्यातील भाविक सहभागी झाले होते.श्री महालक्ष्मी यात्रेला मुंबई खादी ग्रामोद्योग महामंडळाचे सहसंचालक विद्यासागर हिरमुखे, उद्योजक संजय हिरमुखे यांच्या पुढाकारातून ही यात्रा संपन्न होते. पौरोहित्य म्हणून वेदमूर्ती अशोक जोशी यांच्या उपस्थित सर्व विधी संपन्न झाले.

सोमवारी (दि.३१) सातव्या वर्षानिमित्त भुसणी गावासह कदेर व औराद येथील आराधी मंडळ व शिव व हरी भजनी मंडळाच्या वतीने जागरसेवा झाली. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता महालक्ष्मी अभिषेकास जलकुंभ यात्रा, सकाळी सात वाजता गणपती पुजन व पुण्यवाचन, साडेसात वाजता अग्नीस्थापन, आठ वाजता देवता स्थापना नऊ वाजता मुख्य देवता हवन व दहा वाजता यज्ञ सांगता व पूर्णाहुती, महालक्ष्मी महाआरती, अकरा वाजता महाप्रसाद वाटप करण्यात आले.

भजनी मंडळाचे कार्यक्रम, हजारो भाविकांची उपस्थिती
दरम्यान मंदिरात गुलबर्गा येथील सावित्रीबाई बंजारा भजन मंडळ व प्रल्हाद महाराज बंजारा भजनाचे आयोजन करण्यात आलेले होते. यात्रेसाठी भुसणी, औराद, कदेर, कदेरतांडा, औराद तांडा यासह तालुक्यातील हजारो भाविकांच्या उपस्थित उत्साहात संपन्न झाली.

बातम्या आणखी आहेत...