आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय:भुयार चिंचोली सोसायटीची निवडणूक बिनविरोध; चेअरमनपदी पाटील तर व्हाइस चेअरमन गायकवाड

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात २२ विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत २० सेवा सोसायटी बिनविरोध निघाल्या होत्या. भूयार चिंचोली सोसायटीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १९ मे रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत हनुमान शेतकरी विकास पॅनल व उद्धवबुवा महाराज शेतकरी विकास पॅनल यांच्यात लढत झाली होती.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन. पी. हाडूळे, एस. बी. माळी व सचिव राहुल गायकवाड यांच्या उपस्थित गुरूवारी (दि.२) चेअरमन, व्हाइस चेअरमन पदासाठी निवडणूक झाली. उद्धवबुवा महाराज शेतकरी विकास पॅनल आठ तर जय हनुमान शेतकरी विकास पॅनलच्या पाच जागा होत्या. उध्दवबुवा महाराज चॅनलकडून चेअरमन पदासाठी संजय पाटील व व्हाइस चेअरमन पदासाठी ओमकुमार गायकवाड यांनी अर्ज दाखल केले होते. विरोधी पॅनलने अर्ज दाखल केला नसल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एन. पी. हाडूळे यांनी घोषीत केले. संचालक म्हणून कमलाबाई झुंबर गायकवाड, राजेंद्र बब्रुवान सुरवसे, गुलाबबाई बालाजी जोमदे, सरोजा अमर पवार, साबेर लालेसाब तांबोळी, नेताजी दासू गाडेकर यांच्यासह पवनराजे पाटील, महादेव गायकवाड, बंडू भगवान सुरवसे, नयुमपाशा मुर्शद, त्र्यंबक गायकवाड यांची निवड झाली.

यावेळी दिनकर गायकवाड, अशोकराव गायकवाड, केशवराव पाटील, कमलाकर पाटील, सरपंच रणजित गायकवाड, अमर पवार, सचिन गायकवाड, नेताजी गायकवाड, विक्रम गायकवाड, सुभाष गायकवाड, अशोक पवार, प्रमोद गायकवाड, सुधाकर पाटील, बालाजी जोमदे, तानाजी गायकवाड, शेषेराव गायकवाड, दिलीप जाधव, राहुल थोरात, सचिन पाटील, राम गायकवाड, रुद्रापा लाकडे, सुभाष पांचाळ, कालिदास गायकवाड, डॉ. भालचंद्र भोसले, विठ्ठल शिंदे, किशोर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नूतन चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालकांचा ग्रामपंचायतीकडून सरपंच रणजीत गायकवाड यांनी सत्कार केला. अशोक पवार यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...