आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील जिल्हा परिषद शाळेत समाजकल्याण कार्यालयामार्फत २७ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच प्रशालेतील विद्यार्थिनी अक्षता अंकुश पवार हिने शालेय क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर स्विमिंग मध्ये विभागातून प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या २० टक्के सेस फंडातंर्गत २०२२-२३ मध्ये मंजूर झालेल्या वैयक्तिक लाभाच्या लाभार्थींना तरतुदीतून जिल्हा परिषद समाजकल्याण कार्यालयाने २७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४५०० रुपयांची सायकल खरेदीसाठी अनुदान मंजूर करण्यात आले होते. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी, संजय आसलकर, शालेय समिती अध्यक्ष सोमेश्वर स्वामी, ग्रामपंचायत सदस्य व शालेय समिती सदस्य सयाजीराजे हुंबे, उपाध्यक्षा अश्विनीताई चव्हाण, गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग कवडे, इम्रान पठाण यांच्यासह विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी यांनी समाजकल्याण विभागाच्या सायकल वाटप योजनेची माहिती दिली. तसेच अक्षता पवार हिच्या यशाचे कौतुक केले. याप्रसंगी बाजीराव कवडे, नानासाहेब कवडे, कचरे, कुलकर्णी, भोसले, गिरजा गिरी, रुपाली गवळी, संगीता देशमुख यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयचंद्र सातपुते यांनी केले तर आभार संगीता देशमुख यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.