आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:चालकाने निष्काळजीपणे ट्रक‎ चालवल्याने दुचाकीस्वार ठार‎

धाराशिव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर शहरातील सिद्धेश्वर नगर‎ मजरेवाडी येथील मैनुद्दीन मोहम्मद उस्मान गुडमिट्टे हे‎ ६ फेब्रुवारी रोजी एनएच ६५ रोडवर जानकी हॉस्पिटल‎ अणदूर शिवारासमोर रस्त्याने दुचाकीवरून (क्र.‎ एमएच १३ एपी १७८४) जात होते.

दरम्यान‎ ट्रकचालकाने ट्रक (क्र. एमएच २५ यु ३४४५)‎ भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवल्याने मैनुद्दीन‎ यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या‎ अपघातात मैनुद्दीन हे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू‎ झाला. रियाज कोटी यांनी शुक्रवारी (दि.१७) दिलेल्या‎ माहितीवरून नळदुर्ग पाेलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.‎

बातम्या आणखी आहेत...