आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पक्षीप्रेम, अमरकडून 2 वर्षांपासून मोफत घरटे वाटप; कळंब येथील युवकाचा पुढाकार

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घराला घरपण देण्यासाठी सोबत हवी कोणाची तरी, चिमणा-चिमणीच्या संसाराला हवा फक्त दाणा पाणी... या संकल्पनेनुसार कळंब येथील युवकाने पक्ष्यांसाठी नागरिकांना मोफत घरटे देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. अनेकांना त्यांनी मोफत घरटे दिले आहेत. सिमेंटच्या जंगलात पाण्यासाठी तगमगणारे पक्षी नेहमी निदर्शनास येतात. अनेकांकडून त्यांच्यासाठी काही प्रमाणात सुविधा करण्यात येत आहे. घरे उभारणीसाठी झाडे तोडल्याने पशू, पक्ष्यांची भटकंती सुरु झाली आहे. संतानी सांगितल्यानुसार मुक्या प्राण्यांवर दया, करा, त्यांना अन्न-पाणी द्या ही शिकवण लुप्त होत चालल्याने पपक्ष्यांवर उपासमार आली. निसर्गाचे संतुलन वेगाने ढासाळतेय. पशु-पक्षी नामशेष होत आहेत.

निसर्गाचे संतुलन तोलण्याची मोठी जबाबदारी पार पाडणारे पशु-पक्षी जगण्यासाठी धडपडत आहे. या मध्ये पक्षी पाण्याविना व्याकूळ होत आहे. या पक्षांची फक्त उन्हाळ्यात अन्न पाण्याची सोय न करता दररोज पक्षांना अन्न व पाणी मिळावे या करीता शहरातील युवक अमर चाऊस यांनी मोफत घरटी उपलब्ध करुन दिली आहेत.

शंभर घरट्यांचे वाटप सुरू
अमर चाऊस या युवकाने अगोदर कोणाला घरटे पाहिजे असेल, त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन केले होते. याला नागरिकांकडून प्रतिसाद चांगला मिळाला आहे. त्यामुळे चाऊस यांनी स्वखर्चाने १०० घटले विकत घेतले असून त्याचे वाटप सुरू केले आहे.

गतवर्षी १५० घरटे वाटप
मागील वर्षी सुध्दा अमर चाऊस या युवकाने तेलाच्या डब्यापासून बनवलेल्या साधारण १५० घरट्यांचे मोफत वाटप केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. परराज्यातील काही जणांनी सुध्दा चाऊस यांच्याशी संपर्क साधून घरटे मागवून घेतले होते.

पक्ष्यांना खाद्य, पाण्यासाठी दोन वर्षांपासून उपक्रम
पक्षांच्या दाणा-पाण्याची सोय व्हावी या करीता मागील दोन वर्षांपासून पक्ष्यांच्या घरट्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. यावर्षी मोफत रेडिमेड घरट्यांचे वाटप करण्यात येत आहे. साधारण तीनशे जणांना घरटे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आहे. -अमर चाऊस, पक्षी प्रेमी, कळंब.

बातम्या आणखी आहेत...