आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती व पुण्यतिथी:कपिलापुरी ग्रा.पं.च्या वतीने  जयंती व  पुण्यतिथी

परंडा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कपिलापुरी येथील ग्रामपंचायतच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी विविध उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली.

यावेळी गावकऱ्यांना झाडे वाटप तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक कुलकर्णी यांनी केले.यावेळी सरपंच वैभव आवाने,उपसरपंच विलास भोसले रंजितकुमार जैन, श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत पाटील, नितीन शिंदे, बापू शिंदे, कांतीलाल माने आदीच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी फुलचंद देवळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...