आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांचा उस्मानाबाद दौरा:उद्धव ठाकरेंकडे 'हे' करण्याची चांगली संधी, तर शरद पवारांना सगळे माहिती असताना जाणुनबुजून केंद्राकडे टोलवत आहेत; देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

उस्मानाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सरकाराचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे. ते सरकारचा बचाव करुन चांगली कामगिरी करत आहेत

राज्यातील काही भागांमध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेले आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आज माझी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आहे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. आज ते उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनची शेतकऱ्यांची संवाद साधला, यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे चांगली संधी आहे म्हणत एका गोष्टीची आठवण करुन दिली.

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये
उस्मानाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. 'राज्य सरकारने तात्काळ पंचनामे संपवावे, पंचनामे होणार नाही तिथे मोबाइलने फोटो पाठवल्यास मदत देण्यात येईल अशी भूमिकाही घ्यायला हवी. अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. दीर्घकालीन मदतीसाठी वेळ लागेल, मात्र तात्काळ मदत करायला हवी असे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याविषयी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काही जणांना चार हजार, पाच हजार अशी मदत दिली. अशा प्रकारची मदत करुन शेतकऱ्यांच्य जखमेवर मीठ चोळण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करु नये असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडे चांगली संधी आहे
देवेंद्र फडणवीसांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सत्तेत नसताना प्रती हेक्टर 25 हजारांची मदत करण्याची मागणी करण्यात आली होती. यासंबंधीचा व्हिडीओ त्यांनी दाखवला. मुख्यमंत्र्यांकडे आपली मागणी पूर्ण करण्याची ही चांगली संधी असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांनंतर काही दिलासा मिळालेला दिसत नसल्याचेही ते म्हणाले. यासोबतच इच्छाशक्ती असेल तर मदत करता येते, केवळ घोषणा करुन काही होणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

मला राजकारणात रस नाही
ते म्हणाले की, 'जे सत्तेत असतात त्यांनी संयम दाखवायचा असतो. मात्र तेच जास्त राजकीय बोलत आहेत. हे बरोबर नाही, मला राजकारणत रस नाही. तुम्ही राजकीय बोलला तर मी देखील बोलले. तसेच संवेदनशीलता दाखवत शेतकऱ्यांना काय दिलासा देता येईल अशा वक्तव्याची अपेक्षा आपण राज्य सरकारकडून करत असल्याचे फडणवीस म्हणाले.

शरद पवारांना सगळे माहिती असताना जाणुनबुजून केंद्राकडे टोलवत आहेत
देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरही टीकास्त्र साधले. शरद पवरांनी केंद्राकडून मदतीची अपेक्षा केली होती यावरुन बोलताना फडणवीस म्हणाले की, 'शरद पवारांना सगळे माहिती असताना जाणुनबुजून केंद्राकडे टोलवत आहेत. पंतप्रधान संवेदनशील आहेत ते मदत करतील. एवढेच काय तर ते युपीएपेक्षा जास्त मदत सरकार करेल' असेही फडणवीस म्हणाले आहेत. तसेच पुढे म्हणाले की, 'या सरकाराचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे. ते सरकारचा बचाव करुन चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या इतका जाणकार कोणीच नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...