आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपच्या स्थापनादिनानिमित्त् बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील व आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या सुचनेनुसार जिल्हाभरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्थापना दिनानिमित्त घरावर भाजपचे ध्वज लावले होते. प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय येथे सकाळी ९ वाजता भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच याप्रसगी भारतमातेचे पूजन करुन राष्ट्रगीत म्हणण्यात आले. नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुष्पहार अर्पण करुन रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमास भाजपाचे सुरेश देशमुख, नेताजी पाटील, ॲड. खंडेराव चौरे, मोहन कुलकर्णी, पिराजी मंजुळे, ॲड. नितीन भोसले, राजसिंह राजेनिंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
२० एप्रिलपर्यंत संघटनपर्व पंधरवडा साजरा होणार
७ एप्रिल ते २० एप्रिल २०२२ पर्यंत या पंधरवडयात कार्यक्रम राबवून संघटन पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, घर घर नल से जल, पी. एम. किसान सम्मान निधी योजना, महात्मा ज्योतीबा फुले जयंती, कोरोना टीकाकरण , प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, असंघठीत श्रमिक (ई-श्रम कार्ड), प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय पोषण अभियान, आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.