आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुळजापूर:मुघलापेक्षा वाईट आणि इंग्रजापेक्षा ही काळे सरकार, तुळजापुरातील आंदोलनाचा तंबू काढून टाकल्याने भाजप अध्यात्मिक आघाडीची ठाकरे सरकारवर टीका

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पदवीधर निवडणुकीची आचार संहिता तसेच कोविड 19 च्या नियमाचा आधार घेत प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारली होती

राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीने गुरुवार (दि. 05) पासून महाद्वार समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. दरम्यान पदवीधर निवडणुकीची आचार संहिता तसेच कोविड 19 च्या नियमाचा आधार घेत प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र भाजपने अध्यात्मिक आघाडीला पुढे करत आंदोलन सुरू ठेवले होते. प्रशासनाने दिवसभर संयम राखत रात्रीतून मंदिर परिसरातला आंदोलनाचा तंबू काढून टाकला. यामुळे संतप्त झालेल्या आचार्य तुषार भोसले यांनी शहरातील पुजारी मंडळ मंगल कार्यालयात पत्रकार घेऊन उद्धव ठाकरे सरकारवर टिकेची झोड उठवली.

गुरूवार (दि. 05) रात्रीतून मंदिर परिसरातला आंदोलनाचा तंबू हटवून, मंदिर परिसरात कलम 144 लागू करण्यात आले. यानंतर आंदोलकाना मंदिर परिसरात जाण्यापासून रोखल्याने संतप्त झालेल्या भाजप अध्यात्मिक आघाडीच्या प्रदेश अध्यक्षांनी हिम्मत असेल तर निवडणूका घेऊन दाखवा असे खुले आवाहन दिले. महाराष्ट्रात आणीबाणी लागू असल्याचा आरोप करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आचार्य भोसले यांनी केली आहे.

मुघलापेक्षा वाईट आणि इंग्रजापेक्षा ही काळे सरकार

लोकशाही मार्गाचा अवलंब करत शांततेत सुरू असलेले आंदोलन रातोरात तंबू उखडून टाकत उधळूण लावले, साधू संताना कलम 144 च्या नोटीसा दिल्या, लोकशाहीने दिलेला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हिसकावून घेणारे हे सरकार मुघलापेक्षा वाईट आणि इंग्रजापेक्षा ही काळे आहे. शासनाच्या या कृत्याचा सर्व साधु संत काळ्या फिती लावून निषेध करत असल्याचे आचार्य भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

5 वर्ष सरकार चालवून दाखवा
विरोधात बोलणाऱ्या पत्रकार, साधू संताचे आवाज दाबले जात असून महाराष्ट्र आणीबाणी लागू आहे. इंदिरा गांधी यांनी यापूर्वी आणीबाणी लागू केली होती, सध्या ही त्यांच्याच पक्षाच्या सांगण्यावरून सरकार काम करत आहे. केवळ आकड्यांचा गेम करून सत्तेत आलेले हे सरकार असून 5 वर्ष सरकार चालवून दाखवा असे आवाहन आचार्य भोसले यांनी यावेळी दिले.

दरम्यान मंदिर परिसरात कलम 144 लागू करत मंदिराकडे येणाऱ्या सर्वच मार्गावर 40 मीटर परीघात बॅरीकेटीग लावून रस्ते रोखण्यात आल्याने मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर बॅरीकेटीग लावून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आचार्य भोसले आणि सहकार्यांना पोलीस बंदोबस्तातच पुजारी मंडळ मंगल कार्यालयात आणण्यात आले. यावेळी आ. राना जगजितसिह पाटील, भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन काळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विशाल रोचकरी यांचा सह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.