आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपने राज्यात गेल्या वेळी १४५ जागा लढून १०६ जागांवर विजय मिळवला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत यापेक्षाही अधिक स्ट्राइक रेटने भाजप विधानसभा निवडणुकीत यश मिळवेल. तसेच लोकसभा निवडणुकांमध्येही भाजपने राज्यातील सर्व ४८ जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ते भाजप पूर्ण करेल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केला.
लोकसभा निवडणुकीसाठी उस्मानाबाद मतदारसंघात निरीक्षक म्हणून भाजपने मिश्रा यांची निवड केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पहिल्या दौऱ्यात त्यांनी बुधवारी विविध कार्यक्रमांत सहभाग नोंदवला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, निरीक्षक आमदार बाळ भेगडे, ज्येष्ठ नेते अॅड. मिलिंद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते. मिश्रा म्हणाले की, भाजपने आतापर्यंत देशात सत्तेत आल्यापासून मूलभूत गरजा भागवणाऱ्या योजना सुरू केल्या आहेत. नऊ कोटी स्वच्छतागृहे बांधणे, आठ कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना गॅस उपलब्ध करून देणे, वन नेशन वन रेशन कार्ड अशा सर्व योजना जगातील सर्वात मोठ्या योजना ठरल्या आहेत, असेही राज्यमंत्री मिश्रा यांनी म्हटले आहे.
नामांतराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात उस्मानाबादचे धाराशिव तर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर नाव करणे हा येथील नागरिकांच्या दृष्टीने संवेदनशीलतेचा मुद्दा आहे. यामुळे केंद्र सरकार यावरच लवकर निर्णय घेऊन नामांतर करणार आहे. याची सर्व प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.