आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा‎:भाजपचे मिशन 2024; जिल्ह्याची जबाबदारी गृहराज्यमंत्र्यावर‎

उस्मानाबाद‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी २०२४ च्या लोकसभा ‎ ‎निवडणूकीत झेंडा फडकावण्याची ‎ ‎ तयारी भाजपचे आतापासूनच सुरू‎ केली असून उस्मानाबाद लोकसभा ‎ ‎मतदार संघामध्ये यासाठी तयारी ‎ ‎ करण्याची जबाबदारी केंद्रीय‎ गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा ‎ ‎यांच्यावर देण्यात आली आहे.‎ दरम्यान, जुन्या नेत्याला की नवीन‎ प्रवेश केलेल्यास उमेदवारी‎ मिळणार, याची चर्चाही‎ आतापासूनच सुरू झाली आहे.‎ आगामी लोकसभा‎ निवडणूकीच्या दृष्टीकोनातून‎ विकासात्मक व संघटनात्मक‎ बळकटीकरणाच्या अनुषंगाने‎‎ भाजपची लोकसभा प्रवास योजना‎ राज्यात सुरू झाली आहे. यासाठी‎ प्रत्येक लोकसभा मतदार संघात‎ भाजपचा बडा नेता पाठवण्यात येत‎ आहे. प्रत्येक लोकसभा मतदार‎ संघासह त्यातील विधानसभा‎ मतदार संघही डोळ्यासमोर‎‎ ठेवण्यात येत आहेत.

यामध्ये विशेष‎ करून विरोधी पक्षाचे खासदार,‎ आमदार असलेल्या ठिकाणी बड्या‎ मंत्र्यांना पाठवण्यात येत आहे.‎ उस्मानाबाद लोकसभा मतदार‎ संघात मागील निवडणुकीत भाजप,‎ शिवसेना, मित्रपक्षाच्या‎ महायुतीकडून शिवसेनेचे‎ अोमप्रकाश राजेिनंबाळकर निवडूण‎ आले होते. आता राजेनिंबाळकर‎ उद्धव ठाकरे गटात आहेत. पुढील‎ निवडणुकीतही तेच उमेदवार‎ असण्याची शक्यता आहे. त्या‎ दृष्टीने भाजपकडून व्यूह रचना‎ करण्यात येत आहे.‎ यासाठी लोकसभा मतदार संघाची‎ जबाबदारी केंद्रीय गृह राज्यमंत्री‎ अजय कुमार मिश्रा यांच्यावर‎ सोपविण्यात आली आहे.

बुधवारी‎ व गुरूवारी ते व अन्य नेते मतदार‎ संघात ठाण मांडून बसणार आहेत.‎ यावेळी लोकसभा मतदार संघातील‎ प्रमुख पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते,‎ योजनांचे लाभार्थी यांच्याशी संवाद‎ साधण्यात येणार असून प्रेरणा‎ स्थळांना भेट देण्यात येणार आहे.‎ त्यांच्या समवेत लोकसभेचे पालक‎ माजीमंत्री विजयजुमार देशमुख,‎ प्रवास संयोजक माजी मंत्री बाळा‎ भेगडे, मराठवाडा संघटमंत्री संजय‎ कौडगे, लोकसभा संयोजक‎ आमदार राणाजगजितसिंह पाटील,‎ माजी आमदार सुजितसिंह ठाकूर,‎ आमदार राजेंद्र राऊत, आमदार‎ अभिमन्यू पवार, लातूर जिल्हाध्यक्ष‎ आमदार रमेश कराड, सोलापूर‎ जिल्हाध्यक्ष सचिन कल्यांशेट्टी‎ असणार आहेत, अशी माहिती‎ पक्षाच्या सूत्रांकडून देण्यात आली.‎ सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याची‎ जबाबदारी जिल्हाध्यक्ष नितिन काळे‎ यांच्यावर दिली आहे.‎

आगामी उमेदवाराच्या नावाची आतापासूनच चर्चा‎ भाजपकडून काही संभाव्य उमेदवारांची यादी ठरवण्यात आली असल्याचे‎ सुत्रांकडून समजले. यामध्ये उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यातील नेत्यांचाही‎ समावेश आहे. ऐनवेळी शक्तीशाली नाव उमेवारीसाठी घोषित होणार आहे.‎ मात्र, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवीन नेत्यांना की जुन्या फळीतील नेत्यांना‎ उमेदवारी मिळणार, याची चर्चा, दावे - प्रतिदावे आतापासूनच‎ कार्यकर्त्यांमध्ये रंगत आहेत. मात्र, उमेदवाराचे हे नाव आगामी नगरपालिका,‎ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी‎ करणाऱ्याचे असेल अशी माहिती सूत्रांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...