आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी चौकात निदर्शने:कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात काळा दिवस

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने कर्नाटकमधील सीमावासीयांवर कन्नड सरकारकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करून काळा दिवस म्हणून पाळण्यात आला.

दि. १ नोव्हेंबर १९५६ या दिवशी तेव्हांच्या केंद्र सरकारने बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह ८६५ मराठी भाषिक बहुल भाग तेंव्हाच्या म्हैसूर प्रांतात म्हणजेच आजच्या कर्नाटक राज्यात समाविष्ट केले. गेल्या ६६ वर्षांपासून सिमावासिय मराठी बांधवांवर कर्नाटक सरकार भाषिक स्तरावर भेदभाव करत आहे. विनाकारण त्रास देण्याच्या उद्देशाने मराठीयांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मराठी गावांची नावे पुसून कन्नड नावे ठेवली जातात. कन्नड भाषेची सक्ती केली जात आहे. मराठी भाषेला विरोधी केला जात आहे. या सर्व अन्यायाच्या विरोधात सिमावासिय दरवर्षी १ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळतात.

याचाच एक भाग म्हणून शिवराज्याभिषेक सोहळा समिती वतीने निदर्शने करण्यात आली. कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष शशिकांत खुने, उपाध्यक्ष धर्मराज सूर्यवंशी, सचिव दत्तात्रय साळुंके, कार्याध्यक्ष रवी मुंडे, शिवराज्याभिषेक रिक्षा समितीचे अध्यक्ष रमेश यादव, गुंडोपंत जोशी, ॲड. संजय शिंदे, धनंजय साळुंके, व्यंकट कोळी, अमोल पवार, हनुमंत कदम, योगेश आतकरे, विशाल भोसले, संतोष घोरपडे, उज्ज्वल उंबरे, मंगेश निंबाळकर, अमोल शिरसाट उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...