आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद येथील युवक मनेश शेषेराव आव्हाड याच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी, कुटुंबाचे पुनर्वसन करावे, मातंग समाजावर अनेक ठिकाणी झालेल्या अत्याचाराविरोधात संबंधितांना कडक शासन करावे, आदी मागण्यांसाठी शुक्रवारी (दि.१०) लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तहसील समोरील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, २० एप्रिल २०२२ रोजी मनेश शेषेराव आव्हाड या तरुणाची औरंगाबादेत क्षुल्लक कारणावरुन निर्घृण हत्या करण्यात आली. याचा येथे जाहीर निषेध करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, मनेश हा कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले व वृद्ध आई-वडिल आहेत. त्यांना शासनाने २५ लाखांची आर्थिक मदत करावी. मारेकऱ्यांना अटक करुन खटला जलदगती न्यायालयात चालवून फाशीची शिक्षा द्यावी. मागण्या मान्य न झाल्यास लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल. रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. आंदोलनात जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, तुळशीराम देडे, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, तालुकाध्यक्ष सुधाकर बनसोडे, दत्ता जोगदंड, शिवाजी दुनगे, संजय सरवदे, तानाजी शिंदे, नेताजी गायकवाड, केशव सरवदे, नितीन शिंदे, राम कांबळे, वाघंभर सरवदे, सुखदेव होळीकर, अविनाश कांबळे, अमित दुनगे, आकाश गायकवाड, विशाल गायकवाड, अर्जुन थोरात, बाबू माने, बळी मोरे, अभंग थोरात, आकाश पारधे, पांडु पारधे आदींसह लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते, नागरिक सहभागी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.