आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:तुळजाई मंडळाच्या शिबिरात 51 गणेशभक्तांचे रक्तदान

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर खुर्द येथील तुळजाई मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५१ गणेशभक्तानी रक्तदान केले. समाजपयोगी उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या तुळजाई मंडळाने १९९० पासून तब्बल ३६ वेळा रक्तदान शिबिर आयोजित केले. रक्तदान शिबिरात एकूण ३५०० बॅगा रक्तसंकलन करत आदर्श निर्माण केला आहे. तुळजापूर खुर्द येथील तुळजाई मंडळाच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगरसेवक पंडितराव जगदाळे, तुळजाई पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने, मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे, उपाध्यक्ष सुरज जगदाळे, संजय देशमाने, बालाजी देशमाने, रामेश्वर उंबरे, अजय देशमाने आदींची उपस्थिती होती. तत्पूर्वी मधुकरराव चव्हाण यांचा हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ५१ गणेशभक्तांनी रक्तदान केले. मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात विविध समाजपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १९९० पासून तब्बल ३६ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून एकूण ३५०० बॅगा रक्त संकलन करण्यात आले आहे. २६ - ११ मुंबई वरील आतंकवादी हल्ल्याचा वेळी आयोजित रक्तदान शिबिरात विक्रमी १७६ बॅगा रक्त संकलन केले होते.

बातम्या आणखी आहेत...