आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद:हरिनाम सप्ताहात 150 दात्यांकडून  रक्तदान

भूम3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील देवंग्रा येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १५० रक्तदात्यांनी रक्तदान करून चांगला प्रतिसाद दिला.तालुक्यातील देवंग्रा येथील ग्रामदैवत मसोबा, नरसोबा, बिरोबा यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या देवंग्रा गावात ह.भ.प. आप्पासाहेब वासकर महाराज आणि ह.भ.प. विवेकानंद वासकर महाराज यांच्या आशीर्वादाने आणि ह.भ.प. राणू वासकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा भक्त आणि शक्ती अद्भुत युवकांचा एकोपा हा महायज्ञ चालू आहे.

या भक्ती शक्तीच्या महायज्ञात अबाल वृद्ध एकत्र येऊन हा सोहळा संपन्न होत आहे. या हरिनाम सप्ताह मध्ये सामाजिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून युवकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात १५० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...