आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:तुळजापुरातील शिबिरात 50 दात्यांचे रक्तदान ; कै. क्षीरसागर यांच्या पुण्यतिथीनिमित्त केले होते आयोजन

तुळजापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील माजी उपनगराध्यक्ष कै. धन्यकुमार क्षीरसागर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना टिफीन बाॅक्स भेट म्हणून देण्यात आला. हाडको - विश्वास नगर भागातील श्रीकृष्ण मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर संघटक दिनेश क्षीरसागर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीराच्या यशस्वितेसाठी सज्जन जाधव, अनिल आगलावे, दुर्गादास कदम, अतुल सोमवंशी, विजय बोधले, किशोर जाधव, अजय भोसले, अमिर बागवान, आनंद औटी, समीर शेख, संकेत घोगरे, रोहित दरेकर, आदेश इनामदार आदींनी पुढाकार घेतला.

बातम्या आणखी आहेत...