आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव:लोहारा खुर्दमध्ये 51 जणांचे रक्तदान

लोहारा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सह्याद्री बहुद्देशीय सामाजिक संस्था व ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. ५) रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.लोहारा (खुर्द) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सह्याद्री बहुद्देशीय सामाजिक संस्था व ग्रामपंचायतीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच सचिन रसाळ, पोलिस पाटील बिरुदेव सुर्यवंशी, ग्रामसेवक घनश्याम कोकाटे, सह्याद्री बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप लोभे, सचिव भास्कर रसाळ, प्रकाश भगत, माजी सरपंच शेखर पाटील, सोसायटी चेअरमन मुकिंद इंगळे, ग्रामपंचयतीत सदस्य सचिन रसाळ, हणमंत मुर्टे, संभाजी पाटील, बाबा पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती सचिव भास्कर रसाळ यांनी दिली. उस्मानाबाद येथील सह्याद्री ब्लड बँकेने हे रक्तसंकलन केले.

बातम्या आणखी आहेत...