आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:हंसराज गणेश मंडळाच्या शिबिरात 71 जणांचे रक्तदान

परंडा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील हंसराज गणेश मंडळाच्या वतीने शनिवार (दि.३) आयोजित रक्तदान शिबिरात ७१ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन डॉ. विजय करळे यांच्या हस्ते झाले. सोलापूर येथील मल्लिकार्जुन रक्तपेढीच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी डॉक्टर असोसिएशनचे डॉ. देवदत्त कुलकर्णी, डॉ. संजय वाळके, डॉ. मंदार पंडित, डॉ. स्मिता पाटील, डॉ. प्रशांत गोफणे, डॉ. नलवडे, शहाजी नलवडे, डॉ. रेवडकर, डॉ. काळे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी गणेश मंडळाचे मार्गदर्शक नितीन भोत्रेकर, प्रमोद वेदपाठक, मकरंद जोशी, ॲड. श्रीकांत भालेराव, जयंत भातलवंडे, रोहित मुगळीकर, राहुल देवळे, मल्लिकार्जुन ब्लड बँकेचे अध्यक्ष बी. एस. जमादार, संचालक सकिब जमादार व कर्मचारी उपस्थित होते. यशस्वितेसाठी अध्यक्ष अमित जोशी, उपाध्यक्ष शुभम भातलवंडे, खजिनदार समर्थ कुळधर्मे, सचिव अहमद मुजावर, सहसचिव अमोल भराटे, रोहित मुगळीकर, संदीप महामुनी, गणेश पवार, शंतनू भातलवंडे, सुमित भातलवंडे, भगवान शहाणे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...