आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुरुममध्ये आरोग्य तपासणीसह रक्तदान;किसान व बालाजी गणेश मंडळाच्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरूमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बालाजी गणेश मंडळ व किसान गणेश मंडळाच्या वतीने गुरुवारी (दि.१) आरोग्य व रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये दीडशे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर ७१ जणांनी रक्तदान केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते बालाजी गणेश मंडळाच्या शिबिराचे उद्घाटन झाले. सोबाजी गल्ली येथील बालाजी गणेश मंडळाच्या पुढाकाराने शिबिर घेण्यात आले. प्रारंभी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी सभापती मदन पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ, युवक काँग्रेसचे श्रीहरी शिंदे पाटील, सुजित शेळके, गोविंद कौलकर, राम डोंगरे आदी उपस्थित होते.

रक्तदात्यांना माजी नगरसेवक सिद्धलिंग स्वामी यांच्याकडून गणेशाची चांदीची प्रतिमा भेट देण्यात आली. यासाठी मंडळाचे अध्यक्ष सागर शिंदे, उपाध्यक्ष सूरज सोबाजी, सचिव सागर फताटे, सागर पोतदार, जयसिंह खंडागळे, सागर विभूते, निखिल गडकर, किरण सोबाजी, श्रीकांत शिंदे, अभिजित कौलकर, गोविंद सोबाजी, अर्जुन बडदाळे, आकाश डोंगरे, राजकुमार वाले आदींनी पुढाकार घेतला.

गणरायाची प्रतिमा भेट
किसान चौक येथे किसान गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५१ जणांनी सहभागी होत रक्तदान केले. रक्तदात्यांना गणेश मंडळाच्या वतीने गणपतीची प्रतिमा भेट देण्यात आली. यासाठी मंडळाचे अध्यक्ष व्यंकट चौधरी, उपाध्यक्ष अरविंद फुगटे, रवी चौधरी, दत्ता भुसाळे, भगत माळी, संदीप बाभळसुरे, आकाश इंगोले, ओंकार फुगटे, प्रतीक राठोड, ओम राजपूत आदींनी पुढाकार घेतला. यावर्षी शहरातील गणेश मंडळांनी देखावे करण्यावर भर दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...