आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महात्मा बसवेश्वर जयंतीदिनी जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य मूर्ती स्थापना करून जल्लोष करण्यात आला. जयंतीनिमत्त मंगळवार दि.३ ते शनिवार दि.७ पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव समितीच्या वतीने मंगळवार दि.३ रोजी सायंकाळी गावातून बसवेश्वरांच्या भव्य मूर्तीची मिरवणूक काढण्यात येऊन बसवेश्वर चौकात उभारलेल्या मंडपात स्थापना करण्यात आली. यावेळी खंडोबा पणन संस्थेचे चेअरमन सुनील चव्हाण व सरपंच रामचंद्र आलुरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. वेदमूर्ती नरेंद्र स्वामी यांनी पौरोहित्य केले. यावेळी माजी जि.प.सदस्य महादेवप्पा आलुरे, तंटामुक्त अध्यक्ष धनराज मुळे, माजी तंटामुक्त अध्यक्ष सिद्धाराम धमुरे,विधिज्ञ दीपक आलुरे,सोमनाथ शेटे, संगप्पा हागलगुंडे, श्रीशैल लंगडे, अप्पासाहेब शेटे, सतीश मुळे, संदीप धुमाळ आदीसह समितीचे पदाधिकारी, बसवभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
जयंतीनिमित्त बुधवार दि.४ रोजी टेनिसबॉल हाफस्पिच क्रिकेट स्पर्धा तर गुरुवार दि.५ रोजी काव्य संमेलन झाले. शुक्रवार दि.६ रोजी सकाळी खिलार बैलजोडी स्पर्धा, गावरान बैलजोडी स्पर्धा व सुदृढ गाय स्पर्धा तसेच सायंकाळी संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि.७ रोजी भव्य मिरवणूकीने जयंती सांगता होणार आहे. स्पर्धेसाठी भरीव रक्कम बक्षीस म्हणून ठेवली असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कळंबमध्ये अभिवादन कळंबमध्ये महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लिंगायत संघर्ष समिती उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपक्रम राबविण्यात आले. सकाळीच ९ वाजता मन्मथ स्वामी मंदिरात प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कळंब शहरातील लिंगायत परिवाराच्या वतीने मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर चौकात प्रतिमा व ध्वजपूजनाचा कार्यक्रम रितसर पार पडला.
सायंकाळी ५ वाजता संत महात्मा बसवेश्वर महाराजांची कळंब शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला भजनीमंडळ, तसेच मोठ्या प्रमाणात कळंब तालुक्यातील व शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिंगायत संघर्ष समिती उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे, बसव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिशिर राजमाने, उपाध्यक्ष अशोक चिंचकर, सागर मुंडे, निलेश होनराव, बाळासाहेब कथले व शहरातील सर्व लिंगायत बांधव आदिंनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.