आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकंटेनरने दुचाकीस मागून जोराची धडक दिल्याने दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कैलास पवार व दत्ता जगताप (रा. तुळजापूर) या दोघांना या अपघातात जीव गमवावा लागला आहे. अपघात एवढा भीषण होता की कंटोनरने दुचाकी वरील एकाला दुर पर्यंत फरफटत नेल्याने घटना स्थळी रक्तामासाचा चिखल झाला होता. दरम्यान शहराला दोन बायपास असताना ही अवजड वाहणे शहरात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.उस्मानाबादहून तुळजापूर कडे येणारा कंटेनर क्रमांक जी. जे. ३६ व्ही. ४९३३ ने अपसिंगा रोड हुन तुळजापूर कडे येणाऱ्या एमएच २५, एटी ७१११ या दुचाकीस मागून जोरात धडक दिली.
दोन बायपास तरीही अवजड वाहने शहरात
तीर्थक्षेत्र तुळजापूरला सोलापूर - उस्मानाबाद व सोलापूर - नळदुर्ग रोड - लातूर रोड असे दोन बायपास असताना ही अवजड वाहणे शहरात येत आहे. या मुळे अपघात होऊन निष्पापांना जीव गमवावा लागत आहे. सोलापूर - नळदुर्ग रोड - लातूर रोड बाय पास रस्ता अनेक वर्षांपासून अपूर्ण असून अपूर्ण रस्ता काम अनेकांच्या जीवावर उठला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.