आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये संशयित रुग्ण म्हणून दाखल एकाचा रूग्णालयात बाथरुम मध्ये मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी घडला असून सदरील व्यक्तीस बाथरुमचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले. सदरील रुग्ण कोविड संशयित म्हणून दाखल होता. रुग्णाचा मृत्यु नेमका कशामुळे झाला याची अजुनही माहिती समोर आलेली नसली तरी बाथरुममध्ये पडुनच त्याचा मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
उस्मानाबाद शहरातील विकास नगर भागातील एका रुग्णाला लक्षणे दिसुन आल्याने त्या रुग्णास जिल्हा रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. दाखल केल्यानंतर त्याचा स्वॅबही घेण्यात आला होता. कोरोना वार्डामध्ये रुग्णावर उपचार सुरु होते. आज सकाळी तो बाथरुममध्ये गेल्यानंतर बराच वेळ होऊनही परत आला नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशानाकडून खात्री करण्यासाठी बाहेरून आवाज दिला. परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने धावपळ सुरू झाली. साहजिकच तिथे काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचार्यांनी दरवाजा तोडुन आतमध्ये पाहिले तेव्हा रुग्ण खाली पडल्याचे दिसुन आले. प्रशासनाला हे नेमकं कशामुळे घडले याचा उलगडा होत नव्हता. कोरोना वार्डातील रुग्ण असल्याने तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. या रुग्णाचा अहवाल आज येणं अपेक्षित असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्युचे खरे कारण समोर येणार आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक घाडगे यांनी सिव्हीलमध्ये भेट देऊन पाहणी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.