आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद:रोशनपुरीत रूपामाता शुगर्सचे बॉयलर अग्निप्रदीपन; शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवण्याचा मानस

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रुपमाता नेचरल शुगर्स युनिट २ रोशनपुरीचा (ता. माजलगाव) बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत व उद्याेग समूहाचे अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संचालक भाऊसाहेब गुंड यांनी केले.त्यांनी माजलगाव कार्यक्षेत्रातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न करू,असे सांगून भविष्यात दूध डेअरी, इथेनॉल निर्मिती करण्याचा मानस व्यक्त केला. अॅड.व्यकंटराव गुंड यांनी रुपमाता उद्योग समूहाची पार्श्वभूमी सांगितली व पुढील वाटचालीत शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले उपक्रम राबविण्यात येतील,असे सांगितले. बाफना यांनी मनोगतामध्ये रुपामाता उद्योग समूहाअंतर्गत हाेत असलेला कारखाना हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असा आशावाद व्यक्त केला.यावेळी रोशनपुरीचे सरपंच उद्धव ताकट, सुधाकरराव गुंड, अॅड.शरद गुंड,संदीप गुंड,बापूसाहेब गुंड,चीफ इंजिनियर गुंड,पाठक आदी उपस्थित हाेते.आभार भगवानराव कदम यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. विठ्ठल वाघ व नंदकुमार कुलकर्णी यांनी केले. यावेळी कारखान्याचे संचालक अजित गुंड, सुलभा गुंड, बाजार समितीचे संचालक शहाजीराव कोलते,हभप परमेश्वर मकुरे,सरपंच खाडे, अंगद कटके,महावीर मस्के,अजित गुंड कारखान्यातील सर्व अधिकारी,कर्मचारी, कामगारांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...