आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पुस्तकांसह वह्या 40 % महागल्या, 5 रुपयांचा पेन 7 रुपयाला; दप्तर 150 रुपयांपासून पुढेच

उस्मानाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शालेय साहित्यासह शैक्षणिक शुल्क वधारल्याने पालकांच्या खिशावर भार

नवीन शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून प्रारंभ होणार असल्याने शैक्षणिक साहित्याची बाजारपेठ सजली आहे. यंदा शैक्षणिक साहित्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला भुर्दंड बसेल. गेल्या वर्षी ८० ते दीडशे रुपये डझन असणाऱ्या वह्यांच्या किंमतीत आता ४० टक्के वाढ झाली आहे. तसेच पाच रुपयांना मिळणारा पेन आता सात रुपयांना मिळेल. यंदा पहिल्या दिवसापासून शाळा सुरू होतील. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. यंदा साहित्याच्या किमतीत २० ते ४० टक्के वाढ झाली आहे. वह्यांच्या किमती डझन मागे ३० ते ४० रुपयांनी वाढल्या आहे. नामांकित कंपन्यांच्या वह्यांच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी शंभर रुपये डझन असणाऱ्या सर्वसाधारण प्रकारातील वह्या आता १४० रुपये डझनावर गेल्या आहे. वह्यांच्या किमती डझन मागे ६० ते १०० रुपयांनी वाढल्या आहे. कोरोनासह इंधन वाढ आणि कागदाच्या वाढलेल्या किमतीचा फटका पालकांच्या खिशाला बसणार आहे. विशेष म्हणजे दोन वर्षानंतर शाळा नियमित सुरु होत असल्याने वह्या पुस्तकांची दुकानं गजबजली असल्याचे चित्र दिसून येत आहेत. मुलांमध्येही नवीन शैक्षणिक साहित्य मिळणार असल्याने आनंद बघायला मिळाला.

शैक्षणिक साहित्याचे दर
पेन ७ ते १५ रुपये
वॉटर बॅग २० ते १०० रुपये
कंपास पेटी ५० ते १५० रुपये
टिफिन बॉक्स ५० ते २५० रुपये
रेनकोट १५० ते ४५० रुपये
स्कूल बॅग १५० रुपयांपासून पुढे
वह्या ८० ते २०० रुपये डझन

वाहतूक खर्च, कागदाच्या किंमती वाढल्याने जास्त खर्च
कोरोनामुळे दोन वर्षे दप्तर, पाटी, पुस्तक, गणवेश व अन्य साहित्याची विक्री झाली नाही. वाहतूक खर्च, पेपरच्या वाढलेल्या किमतीमुळे शैक्षणिक साहित्य महागले आहे. वह्यांच्या किमती मागील दोन वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. दुसरीकडे पालक जुन्या दराप्रमाणे मागणी करतात.
प्रसाद पाटील, शालेय साहित्य विक्रेते.

शाळांच्या फी मध्येही वाढ
शाळा दोन वर्षे बंद होत्या. पण काही शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवत शुल्क वसूल केले. शासन आदेशामुळे मागील वर्षी शिक्षण शुल्कात १० ते १५ टक्के सवलत देण्यात आली. यंदा शिक्षण शुल्कात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.

पहिलीसाठी लागतील एक हजार
सन २०१९ मध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक साहित्य ७०० रुपयांपर्यंत मिळत होते. यंदा त्यासाठी एक हजार रुपये मोजावे लागतील. इंधन दरवाढ, मजुरी वाढल्याने साहित्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...