आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद तालुक्यातील दुधगावनजिक लातूर ते बार्शीरस्त्यावर दोन पिकअप व एका दुचाकीच्या विचित्र अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले. यामध्ये एका दोन वर्षीय मुलीचा समावेश आहे. अन्य सहा ते सात जण किरकोळ जखमी झाले. हा प्रकार बुधवारी (दि. ११) रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडला.
बार्शीहून नांदेडकडे निघालेले पिकअप मालवाहू जीप (एमएच २६, बीई ५५२८) तसेच लातूरहून भूम तालुक्यातील गोलेगावकडे निघालेले पिकअप मालवाहू जीप (एमएच २५, पी ५०७५) यांची समोरासमोर धडक झाली. अपघात ग्रस्त वाहनांना एका दुचाकीने (एमएच २५, डी ८२७८) धडकून दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. अपघातात गोलेगाव (ता. भूम) येथील दोन वर्षीय राधिका शिंदे हिच्या डोक्याला गंभीर दुखापत आहे.
जखमींना उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात पाठवले. तेथे प्राथमिक उपचारानंतर राधिका व दिनेश शिंदे यांना सोलापूर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातामध्ये मोहन शिंदे, आकाश शिंदे, अशोक शिंदे, चिमुबाई शिंदे, आगन शिंदे, आदी जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच ढोकी पोलिस हवालदार गजेंद्र गुंजकर यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने रोडवरील वाहने बाजूला सारत वाहतूक सुरळीत करत तत्काळ अपघातग्रस्तांना रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली. हा अपघात विचित्र पद्धतीने झाल्याने चर्चा होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.