आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सकाळी नाश्त्यात उसळ, भोजनात प्रोटीनयुक्त भाज्या ; दर दिवशीची मेनू वेगळा

उस्मानाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्पर्धेसाठी आलेल्या खो खो खेळाडूंना सकाळी नाष्ट्यात वेगळ्या वेगळ्या धान्यांची उसळ तर भोजनात दोन्ही वेळी प्रोटीन वाढवणाऱ्या भाज्या देण्यावर आयोजकांनी भर दिला. यामुळे भोजनामुळे पोट बिघडण्याची तक्रारीही आल्या नाहीत. विविध राज्यातील खेळाडू असल्यामुळे भोजनात सर्वच बाबतीत समन्वय साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

अखिल भारतीय राष्ट्रीय खो-खो स्पर्धा गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. स्पर्धेमध्ये खेळाडूंना पौष्टिक अन्न देण्यासाठी एका टीमची निवड करण्यात आली होती. यामध्ये प्रमुख म्हणून शरद व्हनकडे यांची निवड करण्यात आली आहे. सोमनाथ बनसोडे, अजित शिंदे, उमाकांत गायकवाड, नागेश वाडीकर हे त्यांच्या साथीला आहेत. स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंना पौष्टिक अन्न कसे देता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. नाष्ट्यामध्ये खेळाडूंना वेगवेगळे प्रकारचे पदार्थ जेणेकरून खेळताना खेळाडूंना कोणताही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून केला गेला. पाच दिवसाचा मेनू कि दर दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने दिला गेला.

त्यामध्ये प्रामुख्याने ब्रेडच्या इडली, सांबर वडा, सांबर चटणी, पायनापल शिरा, पोहेही देण्यात आले. जास्तीत जास्त करून खेळाडूंना ऊर्जा कशा पद्धतीने प्राप्त करता येईल, याकडे जास्त लक्ष दिले गेले. दुपारच्या मेनूमध्ये कडधान्य, पालेभाज्या वापरून भाज्या तयार करण्यात आल्या. त्यामधून प्रोटीनचे प्रमाण खेळाडूंना जास्तीत जास्त मिळावे या दृष्टिकोनातून पाहिले गेले. भाेजनात वरण, एक पालेभाजी एक कडधान्यांची भाजी देण्यात आली. त्याबरोबर चपाती व गोड पदार्थ देण्यासाठी प्रयत्न केला. अन्य राज्यातून आलेल्या खेळाडूंना त्यांच्या राज्याप्रमाणे जेवणामध्ये मेनू ठेवण्याचा प्रयत्न केला. यासाठी फुलके, चपाती, पुरी व वेगवेगळा भात उपलब्ध करण्यात आला. काही राज्यातील मुले भात अधिक घेतात. यामुळे त्यांचीही खास तजबीज करण्यात आली. एकूणच चतुरस्र आहार देण्याचा यामध्ये प्रयत्न करण्यात आला. यामुळे ही आहार व्यवस्था प्रत्येक राज्यातील खेळाडूंना भावत होती.

तेलाचा कमी वापर भाज्यां करताना किंवा अन्य पदार्थ करत असताना तेलाचा अत्यंत कमी प्रमाणात वापर करण्यात आला. तसेच तेलकट, तळलेले, अधिक आंबवलेले पदार्थही भोजन व नाष्ट्यात टाळण्यात आले. यामुळे सध्याच्या कफजन्य वातावरणातही भोजनात कोणालाही त्रास होऊ शकला नसल्याचे संयोजकांनी सांगितले. जीवनसत्व मिळण्यासाठीच अन्न व्यवस्था करण्यात आली.

खेळाडूंनी पोचपावती दिली खेळाडूंना कमीत कमी कार्बोहायड्रेट देणे आणि जास्तीत जास्त प्रोटीन देण्याकडे आणि तेही अन्नपदार्थ मधून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याची पोचपावती प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघाचे संघ व्यवस्थापक, कोच, पंच पदाधिकारी यांनी दिली. येथील भोजनाची जबाबदारी पार पाडताना आनंद वाटला. शरद व्हनकडे, भोजन समिती प्रमुख.

बातम्या आणखी आहेत...